STORYMIRROR

Dr-Sanjay Shedmake

Others

3  

Dr-Sanjay Shedmake

Others

स्त्री म्हणजे खेळण नव्हे !!

स्त्री म्हणजे खेळण नव्हे !!

1 min
361

पुरुष प्रधान संस्कृतीत 

केवळ चूल जाळण नव्हे।

पराक्रम ऐकलीत तर 

स्त्री म्हणजे खेळण नव्हे।


वर्चस्व कुणाचे भाईचे की ताईचे

काळ आठवा जीजाई आईचे

 स्त्री म्हणजे खेळण नव्हे।


 शिक्षणाचा वसा झिरपत आला 

साथ दिली सवित्रीने ज्योतिबाला

 स्त्री म्हणजे खेळण नव्हे।


रमाइची काय वेगळी बात

बाबासाहेबांना दिली साथ

 स्त्री म्हणजे खेळण नव्हे।


दिन दुबळयाची करुन सेवा 

मदर टेरेसा चा वाटतो हेवा

 स्त्री म्हणजे खेळण नव्हे।


 उचलले तू मीठ मुठभर स्वातंत्र्या साठी

बापूं सोबत कस्तूरबानी बांधल्या गाठी

 स्त्री म्हणजे खेळण नव्हे।


दुबळीला संधी मीळाली की ही चंडिका

विश्वमित्राचा तप भगं करणारी मेनका

 स्त्री म्हणजे खेळण नव्हे।


Rate this content
Log in