पिल्लू
पिल्लू
1 min
364
पिल्लु भुर्रकन उडुन जाईल का?
प्रेमाच्या आशेने परत येईल का?
उडण्या साठी पुन्हा भरारी घेईल का?
प्रेमाचा वसा तसाच पूढे नेईल का?
पिल्लु भुर्रकन उडुन जाईल का?
पूढे प्रकाश दिसतो नात्याचा
पढला आहे विळखा गोत्याचा
पंखात बळ मीळाल्यावर कुणी
माझ्या कडे वळुण पाहिल का?
पिल्लु भुर्रकन उडुन जाईल का?
प्रीत तिलाही, मलाही कदाचित
मला ना विस्मरण, तिला ही आशा
नाण्याच्या बाजू,ती काय मी काय
मलाही प्रेमाणे कवेत घेईल का?
पिल्लु भुर्रकन उडुन जाईल का?
पंख उडण्यासाठीच असतात
पंख भरारी घेण्यासाठीच असतात
पंख जगण्या साठीच असतात
पिल्लु प्रितीचे गीत गाईल का?
पिल्लु भुर्रकन उडुन जाईल का?
