STORYMIRROR

Dr-Sanjay Shedmake

Others

4  

Dr-Sanjay Shedmake

Others

कवाडे बंद झाली !

कवाडे बंद झाली !

1 min
456

सर्व देवतांची आता कवाडे बंद झाली।

स्व जपण्यास चाणाक्ष पुजारी दंग झाली।


कुणीही फिरकला नाही कट्टर भक्त

जीव लपवीण्यास आरतीही बंद झाली।


सर्व दिशांच्या ओस पडल्या दक्षिणा पात्र

मोजणारयांची आवक थोडी बंद झाली।


कोठे गेलेत सर्व लोक नवस करणारे

मुलांना शाप देणे का खरेच बंद झाली?


आताच तर वरदान देत असतील देवता

तुमच्या गर्दिने त्याचें घुसमटणे बंद झाली।


आठवित असतील आता पानसरे, दाभोळर

आता अंधश्रद्धेची ही दारे बंद झाली।


देव तारी त्याला कोण मारी 

रटणारयांची आज तोंडे बंद झाली।


Rate this content
Log in