सोनपावली नववर्ष
सोनपावली नववर्ष
1 min
239
नवीन वर्षा समजून घेरे
व्यथा मागच्या वर्षीची
पुन्हा आणू नकोस संकटे
दिशा दाखव संपन्नतेची
अंधारात घरात बसणे
टांगती तलवार काळाची
तोंडालाही फडके बांधणे
घुसमट आतल्या श्वासाची
जथ्थे निघाले लोकांचे
लढाई सारी जगण्याची
कोण कशाला निस्तरावे
वेळ फक्त निभावण्याची
बातम्या साऱ्या ताऱ्यांच्या
पूरात तळमळ शेतकऱ्यांची
वाट संकटी वादळवाऱ्याची
माणसाच्या असहायतेची
पुन्हा वाहू दे प्रसन्न वारे
भ्रांत मिटो रोजगाराची
फळू-फुलू दे शेती सारी
सोनपावली नांदी नववर्षाची
