STORYMIRROR

Smita Khanzode

Others

4  

Smita Khanzode

Others

सोनेरी पहाट

सोनेरी पहाट

1 min
28.8K


हे शेतकरी दादा,

धरणीमातेच्या सपूता,

नैराश्याची कात टाकून दे राजा

सुगीचे दिवस येणार आता ll


कर्जाचे डाेंगर माफ हाेणारl

विराण वाळवंटात फुले उमलणार ll


जीव देण्याचा नकाे करू विचार

बायकाे पाेरांचा तूच की रे आधार ll


जरी असला हटकाेर मेघराजा

विसंबू नकाेस त्यावरी बळीराजा ll


तळी विहीरी खणून घेऊ जादा

सरकारने आणली रेन वाॅटर हार्वेस्टींगची सुविधा ll


शेतीला पूरक जाेडधंदा कर बाबा एखादा

घराचा चेहरामाेहरा बदलवून टाक समदा ll


भारतमातेचा सुपुत्र खरा , तूच आहेस राजा

तुझ्याविना जीवन आमचे, पाण्याविना मासा ll


बाबारे, सूर्यास्त कधीच नसताे जीवनात

साेनेरी पहाट येतच असते आयुष्यात ll


भारतमातेच्या कुशीतून पुनश्च निघेल साेन्याचा धूर

बळीराजा तुझ्यामुळेच दिवस नसेल आता ताे दूर ll


Rate this content
Log in