STORYMIRROR

Smita Khanzode

Others

4  

Smita Khanzode

Others

पावसाचं असंही एक रूप

पावसाचं असंही एक रूप

1 min
40.8K


।। पावसाचं असंही एक रूप... ।।

पावसाचं असंही एक रूप...

दरवळणार्या निशिगंधासारखं ।।

इइ मोहक मंद मंद

सुगंध देऊन हळूवार जपणारं ।।

गार गालिचा पहाट वारा..

अन् फुलांच्या वेडानं गंधाळणारं।।

सळसळणार्या चिरतरुणासारखं..

वेड्या आशेच्या अंकुरानं सुखावणारं ।।१।।


पावसाचं असंही एक रूप....

भीषण रुद्रावतार धारण करतं ।।

शंकराच्या तिसर्‍या डाेळ्यानं..

जगाकडे उगीचच केविलवाणं बघतं।।

सागराच्या तांडव नृत्यानं.....

फेसाळणार्या लाटा अधिकच बेफाम हाेतात।।

सरितेच्या उच्छृंखल पदन्यासानं...

गावेच्या गावे क्षणातच ओस पडतात ।।२।।


पावसाचं असंही एक रूप....

याचनेसाठी 'आ' वासून उभं राहतं ।।

देणाऱ्याचे अनंत हात...

दशदीशांनी चाैखुर उधळीत येतात ।।

अंतरीत प्रेमाचा स्फुल्लींग

वणवा हाेऊन पेटत असणार ।।

माणुसकीचा झरा सकल मनात...

अखंड अविरत वाहत राहणार ।।


Rate this content
Log in