सोळावं वय
सोळावं वय
सोळाव्या वयाच्या मी उंबऱ्यावरी
धडकी भरु लागली या उरी
बेभान झाल्यात पाखरं सारी
पाहून ज्वानीची माझ्या उभारी llधृll
येता जाता चोरुन पहाती
कोणी असा डोळा मारती
किती जपावं तरी माझी कांती
यौवन खुले मज वाटे भीती
नेसले राया पैठणी मी भारी,नाचरा मोर हो पदरावरी
बेभान झाल्यात पाखरं सारी, पाहून ज्वानीची माझ्या
उभारी. ll१ll
पाहून घाली कौणी शीळ
राया बसवावा कसा हो मेळ
तुम्हासाठिच जीव तळमळ
सोसंना मला हो आता कळ
दारावरी चकरा मारी,जीव राही ना माझा थारी
बेभान झाल्यात पाखरं सारी,पाहून ज्वानीची माझ्या उभारी ll२ll
पिरत राया माझी तुम्हा वरी
दुरुनच मॅसेज काहो करी...
याव राया तुम्ही आता सत्वरी
वाट पाही मी उभी राहून दारी,
तुम्हा साठीच माझा जीव हा झुरी,लग्नाची करु तयारी
बेभान झाल्यात पाखरं सारी, पाहून ज्वानीची माझ्या उभारी ll३ll
