स्मित
स्मित
1 min
271
काहीसा चिंतीत, हताश
निराश खाल मानेने
तशात ती बाजुला
तीचा आश्वस्त, प्रेमळ
आल्हाद स्पर्श खांद्यावर
हलेकच पाठी, मायेने कसातुन
अन मधाळ बोल कानी, म्हणे
कसे वाटते अता ?
मला ?
अ....!
सुंदरसा धबधबा कोसळतोय
ऊंचावरून
त्या खाली उभा मी
तुषार झेलीत अंगावर
खाली आनंद डोह पसरलेला
त्यात मी सूर मारतोय
छानसे डुंबल्यावर मनसोक्त
विसावतो काठच्या हिरवाईवर
घन भरल्या आभाळी पहात
हलके हलके प्रेम बरसते
आपसुक डोळे मिटतात
ऐकू येतात सूर बासरीचे
पसरते मुखी
आत्मानंदी स्मित
मीरेस जसे कृष्णभेटीचे
अन, मी तिला पाहीले
तर
तिचे डोळे मिटलेले
आणि मुखी दिसते
स्मित तसेच !
