शुभ दिपावली
शुभ दिपावली
हर्ष विजयाचा सण विजयाचा । असत्यावरी सत्याचा
अधर्मावरी धर्माचा । असुरांवरी प्रभु पुरुषोत्तमाचा
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
सुदीन हे सौख्य भरे । स्वास्थ भरे संपन्न से
जननी जानकी माता । निज गृहे आगमन हे आगमन हे
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
तिमीर छेदती तेजो तिर । मोह जाळती आत्म ज्योती
ज्योती ज्योती तेवूनीया । स्वागत करुया स्वागत करुया
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
मंगल प्रहरी स्मरण करता । सोडवी श्रीहरी नरकवास
सुटले बंध संपल्या यातना । लाभले सुख सौभाग्य धन
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
लेप प्रितीचा अभ्यंग अर्पूनी । न्हाऊ घालुनी सजविते
भाग्य ज्योती घेऊन करी । पूजीते लक्ष्मी नारायणा
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
सरले साल सरल्या प्रतीक्षा । आनंदास उधाण येइ
भेटीस जेंव्हा भाऊ जाइ । ओवाळीते ती प्रेमभरे प्रेमभरे
तव सर्वांसी तव सर्वांसी
शुभ दिपावली शुभ दिपावली
