श्रावण
श्रावण
आला श्रावण, मन-भावन श्रावण
आनंदाचे करित शिंपण
धरतीवर झाली सुखाची पखरण
आला श्रावण, मन-भावन श्रावण
पावसाच्या सरी बरसती
हिरवळ दाटे चहुकडे
पिके डोलती शेतांमधुनी
इंद्रधनुषाचे ही दर्शन घडे
घरोघरी पूजा, सजल्या मंगळागौरी
विविध पिठे, काडवाती अन लाहयांची तयारी
आई -आजी व्रतवैकल्यात अन देवघरात रमल्या
श्रावण चहूकडे सात्विकता घेऊनि आला
मुल
े पावसात बागडू लागली,
पाण्यात होड्या सोडू लागली
कोणाला पाऊस गीतें तर कोणाला विरह गीते सुचू लागली
उमललेली फुले नेत्र सुखावू लागली
बळीराजाच्या समाधानाला पारावार नसे
सर्वांच्या आनंदाने कर्ता पुरुष ही सुखावत असे
पक्ष्याची किलबिल झाली सुरु
मोराचा पिसारा लागला फुलू
आला श्रावण, मन-भावन श्रावण
सर्वाना सुखावणारा
आनंद देणारा
आला श्रावण, मन-भावन श्रावण