पार्वती नंदन - श्री गणेश
पार्वती नंदन - श्री गणेश
1 min
429
पार्वती नंदना श्री गणेशा
अगाध तुझ्या लीला
मी अश्विनी आले तुज
काव्य-पुष्प वाहायला॥
तू विद्यादाता, तू करुणासिंधु,
गणाधीश तू, तू कृपाकर्ता,
आशिष द्यावे मजला,
दूर व्हावी मूढता॥
तू भक्त-रक्षक, तू विघ्नहर्ता,
तू सुखकर्ता, तू दुःख-हर्ता
सर्व संकटातून तू तार मज सत्वर
मजवरी असो सदा कृपेची पाखर॥
विद्येचे दान तू दे
सद्बुद्धी मजला लाभू दे
धन-धान्य लाभो, अंती मोक्ष मिळो
तुझ्या आशीर्वादाने जीवन सफल होवो॥