STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

3  

Sanjay Dhangawhal

Others

श्रावण श्रावण आला

श्रावण श्रावण आला

1 min
400

श्रावण आला श्रावण आला

आला आनंदाला बहर

लाजरे बुजरे ढग सारे

झाले काळेभोर


रिमझिम रिमझिम

पाऊस आला

धावत आली सर

चिंब चिंब भिजताना

पाखरे झारीत सैरभैर


नवी नवरी वसुंधरा ही

बिंदी चंद्राची कोर

घेऊन आला शालु सप्तरंगी

हिरवा हिरवा डोंगर


पहाट कोवळी मस्त आली

झरे झिरव्यांचा काहोर

सुर सनईचा वाजुन वारा

थुई थुई नाचतो मोर


झाडे झुडपे पाने फुले

थेंब थेंब दवांनी 

झालीत अधीर

इंद्रधनुष्याच्या कुशीत दिसे

श्रावण सुंदर श्रावण सुदंर


साहित्याला गुण द्या
लॉग इन