श्रावण धारा
श्रावण धारा
1 min
2.9K
हिरव्या हिरव्या वनराईने
नटली वसुंधरा
घेऊन येई श्रावण सरींना
गार गार वारा
नवक्रांतींने उजळून निघती
जुने पुराणे वृक्ष ते
त्या वृक्षांना जणू लाजवी
नवतृणांचे अंकूर ते
हिरवी साडी, हिरवी चोळी
नटली अवघी ही अवनी
बघत रहावे असे वाटते
तव डोळे भरुनी
खेळ निराळा या सृष्टीचा
उन्हात बरसे पाऊस धारा
क्षणात बदले आसमंत सारा
कधी वारा, तर कधी गारा
फुला फुलवितो
बीया रुजवितो
धन्य तो पावसाळा
अन त्या श्रावण धारा!
