STORYMIRROR

Santosh Patil

Others

3  

Santosh Patil

Others

चांदोबा चांदोबा

चांदोबा चांदोबा

1 min
14.9K


चांदोबा चांदोबा तू 

जमिनीवर येशील का?

आकाशातील गमती जमती 

मला पण सांगशिल का?

काळ्या ढगाआडून

 येशील लपून छपून

 आई झोपी गेल्यावर 

खाशील पोळ्या चापून

आमावस्येच्या रात्री तू, 

गायब कोठे होतोस? 

त्यानंतर थोडा थोडा, 

डोकावून पाहू लागतोस 

पौर्णिमेच्या रात्री तुझ्या, 

आनंदास येते भरती 

चांदण्यांचा सडा पसरे,

तुझ्या अवती भोवती. 

म्हणे तू अन् पृथ्वी रोज 

रस्सीखेच खेळता 

भरती अन् ओहोटीने 

समुद्राला का छळता . 

तुमचा खेळ होतो 

पण जीव आमचा जातो 

गोष्ट तू भेटल्यानंतर 

नक्की तूला सांगतो

आकाशात राहताना तुला

वाटते का कधी भीती?

धपकन पडेन कधी 

येऊन पृथ्वीवरती

चांदोबा खरं सांग 

येशील का रे खाली?

आईची चुकवून नजर 

मी येईन तुझ्या घरी. 

मग खूप खूप खेळू 

आपण दोघे लपंडाव 

ढगाआडून दाखवेन तुला 

माझा छोटा गाव 

 


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை