STORYMIRROR

Khushal Gulhane

Others

4  

Khushal Gulhane

Others

शेतकरी बाप

शेतकरी बाप

1 min
192

माह्या शेतकरी बाप

त्याची काय सांगू गोठ,

दिसे छातीच्या पासोया

डिके पाठीसनी पोट.


नाही त्याले हेवादावा

त्याचं न्यारंच हिर्दय,

छाती हाडकुळी झेले

ऊन,वारा नि वादय.


सोया,कापूस जवारी

घाम गावुनिया काढे,

नसे भाजीसाठी तेल

गाठा कपड्याले पाडे.


त्याच्या राह्यत्या घराचे

कौलं गेलेत फुटून,

बासे फाटे भिरडले

आडं राह्यलं तुटून.


सर्जा- राजा ,गाई-म्हशी

सारं त्याचं गनगोत,

सुना झाला कोठा आता.

पडे गहान पागोटं.


असो लगन,मरन

नाही केलं कोना कमी,

पन त्याच्याच जीवाची

आता राह्यली ना हमी.


कर्जातच जल्म झाला

कर्जातच थो मरन,

भोग माह्या हो बापाचे

सांगा कवा हे सरन ?



Rate this content
Log in