STORYMIRROR

Khushal Gulhane

Others

3  

Khushal Gulhane

Others

नौकरीसाठी.........

नौकरीसाठी.........

1 min
143

नौकरीबिना मनलं ज्यमन कसं आपलं ?

नौकरीसाठी इचीभईन लगन करून टाकलं ॥धृृ॥


बुढाबुढिच्या कमाईवर झालो होतो बी. ए.

नौकरीवर माह्यावाले लागून होते डोये,

देवायिले नवस माय करत होती माही

बाले माह्या झाली होती ईन पाहाची घाई,

म्याही देलता होकार, तिथंच सारं चुकलं ॥१॥


शेला टाकून खांद्यावरती फिरे मंग बाप

फिरू फिरू त्याले कानी लागली होती धाप,

पाच-पन्नास घरी बुढा आला होता जेवून

झालं होतं वरीस मले मार्केटात येऊन,

नौकरीच्यानं मातर माह्यं गेसिंग होतं हुकलं ॥२॥


बेत केला मंग म्या बुढा करासाठी हासरा

नौकरी देनार्‍यालेच करीन मनलं सासरा !

मंगसन्या तशीच बानं सुरू केली तलास

भेटला एक मामलेदार ,काम झालं खलास,

पसंत केली पोरगी , जरी पोट होतं झुकलं ॥३॥


करतो मने पोराले तयसिलीतला बाबू

उडून टाकू बार आंधी,मंग नौकरीचं बघू,

लेकरं झाले तीन अजून काॅल नाही आला

भरोस्याच्या म्हशिले हल्या होऊन गेला,

आता मले कयलं ,त्यानं गनित होतं फेकलं ॥४॥


हिले पाहून गावातले भेते समदे पोट्टे

काऊनका चालतानी हे लोकाहिले खेट्टे ,

पया मनते लेकहो , नाहितं आपुन दबू

त्याचं होय 'रोलर' हे, जो होनार होता बाबू,

मिशी झाली पांढरी माही, डोक्सं सारं पिकलं ॥५॥


पावडर, लिपस्टिक थे असं काही फासते

जशी काही सिनिम्यातली टूनटून दिसते,

कामधंद्यामंधी मनानतं बारा गाडे बोंब

भांडासाठी मातर तिले भल्ला येते कोंब,

खरं सांगतो रातीच म्या सारं आंग शेकलं ॥६॥


जिनगानीचा माह्या हिनं केला असा हासा

दुखते कुठं, सुखते कुठं , माही मले पुसा ,

मोठ्याची पोरगी राजेहो करून बेज्ज्या फसलो

आगीतून निंघून जसा फुफाट्यात धसलो,

हिच्यापायी होतं थे चार एक्कर इकलं ॥७॥



Rate this content
Log in