STORYMIRROR

Khushal Gulhane

Others

4  

Khushal Gulhane

Others

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा

1 min
329

येरे येरे पावसा येरे येरे पावसा ये, माझ्या शाळेला सुट्टी दे ॥धृ॥

गार गार वार्‍याला पाठव रे,सरीवर सर साठव रे

शाळा माझी गड्या,सुरू झाली वेड्या शाळेवर माझ्या तू ये ॥१॥


शंका तुझी मला येते रे, दडी मारून तू बसशील रे !

येऊ नको मोठा,पण होऊ नको खोटा ! दादा माझा तू ये ॥२॥


झाडावेलींना फुलव रे,पशुपक्ष्यांना डोलव रे

होऊ नको निष्ठुर,झाले सारे आतुर तुझ्यासाठी राज्या,तू ये ॥३॥

मोराला थुईथुई नाचव रे, बेडकाचा ऐकू दे डराव रे

अंगणात नाचेन, चिंबचिंब भिजेन देईन पैसा तूये ॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन