निसर्ग
निसर्ग
1 min
219
आल्या रेशमाच्या धारा
इंद्रधनू गगनात,
पडे नवरत्न सडा
धरत्रिच्या अंगणात.
तृृप्त वसुंधरा राणी
लाली फुललीसे गाली,
ओल्या चिंब सजनीस
हाक सजनाची आली.
शीळ हिरवी घातली
असा खट्याळ हा वारा,
कांती चुंबिली नितळ
दंग आसमंत सारा.
क्षण प्रणयाचा धुंद
वृृक्ष लतिका लाजल्या,
सरी श्रावणाच्या धन्य
शीरी प्रेमिकांच्या झाल्या.
