सौदामिनी (पंचाक्षरी काव्य)
सौदामिनी (पंचाक्षरी काव्य)
1 min
407
हे गृहलक्ष्मी
तु अर्धांगिनी
रुप सुंदरी
मन मोहीनी ll१ll
कामात दंगे
सदा तू रंगे
मुलांन संंगे
वासल्य तू ll२ll
रुप लाघवी
घर सजवी
कटी कसून
देह झिजवी ll३ll
सहचारिणी
तु पतीव्रता
तु नारायणी
सखे तू.प्रिया ll४ll
नाही अबला
आहे सबला
नव पिढीची
आहेस दुर्गा ll५ll
तुझा प्रवास
सर्वांचा ध्यास
तू सौदामिनी
या जीवनात ll६ll
