STORYMIRROR

Archana Rahurkar

Others

3  

Archana Rahurkar

Others

सावित्रीचा वसा असा

सावित्रीचा वसा असा

1 min
196

ज्योतीबांनी घेतला ध्यास

सावित्रीबाईंची आस

धरी शिक्षणाची कास

प्रथम शिक्षिका खासll१ll


केला उभा शिक्षणाचा

पाया जगी रोवियला

घरा घरांतून लेक

जाऊ लागे शिकायलाll२ll


लोक मारी शेण गोळे

सहन करीत सारे

वाही शिक्षणाचे वारे

चमकवले हो तारेll३ll


केली न कशाची पर्वा

चुल व मूल भावना

मोडीत काढत दिला

शिक्षणाचा मार्ग सर्वांll४ll


अनाथांची होई माई

भुकेलेला खाऊ घाली

माया लावत हो घास

पांघरुन ऊब देईll५ll


चटया विणून लावी

वस्तीगृहा त्या हातभार

कष्टातून उभं हे सारं

सावित्रीबाई हो थोरll६ll


कर्तृत्वानं मोठी झाली

जग जिंकुनीया गेली

मना मनात कोरली

सावित्रीबाई माऊलीll७ll


शिक्षणाने मिळवून

दिला आम्हा जगी सन्मान

सावित्रीच्या हो लेकी आम्ही

आहे आमचा अभिमानll८ll


Rate this content
Log in