रस्ते वेगळे झाले
रस्ते वेगळे झाले
1 min
411
विरहाच्या अग्नीत
असे काही घडले की
शब्द कंठात अडकले
गुपिते डोळ्यांनी सांगितले.
गाला वरून ओघळणाऱ्या
शब्दांनी मात्र हासत
उदास डोंगराला आठवणीतले
हिरवाळीचे गीत सांगितले.
रस्ते भलेही वेगळे झाले
किती मरतात एकमेकांसाठी
स्वतः मरण यातना भोगत
सुख प्रेमासाठीच मागितले.
