प्रश्न
प्रश्न
1 min
259
प्रश्न पडला काळाकुट्ट
रात्रीला पडला उद्याच्या दिवसाचा
प्रश्न पडला या धरणीला
बरसणाऱ्या पावसाचा
प्रश्न पडला जीवनालाही
कधी त्या मरणाचा
प्रश्न पडला वाघालाही
भक्ष्य होणारं हरणाचा
प्रश्न पडला देवाला
कधी त्या दानवाचा
कुणी मानवाला दुसऱ्या
प्रश्न दुसऱ्या मानवाचा
काळजीत एकदा दाहक
सुर्याला प्रश्न पडला
शितल अशा चंद्राचा
आणी भावनेच्या भरात
तख्तही उलटून टाकला
त्याने देवराज इंद्राचा
