मी एकटाच निघालो
मी एकटाच निघालो
1 min
408
......मी एकटाच निघालो बघावयास
क्षितीजाला समुद्राच्या बेधुंद लाटेवर
मी एकटाच निघालो शोधावयास
स्वत:ला रानातल्या नागमोडी वाटेवर ...
...मी एकटाच निघालो वेचायला
चार थेंब दुर्मिळ अश्या कस्तुरीचे
मी एकटाच निघालो ढुंडायला
ठावठिकाणा स्वप्नातल्या परीचे ...
....मी एकटाच निघालो पुसायला
चंद्राच्या त्या काळ्याभोर डागांना
मी एकटाच निघालो आव्हान
द्यायला जिवनाच्या उर्वरित भागांना ...
...मी एकटाच निघालो किंमत
एकेका अश्रुंची मोजायला
मी एकटाच निघालो परत
स्मशानातुन एक अभद्र
तारा म्हणून सजायला...
