प्रेमात पडताना
प्रेमात पडताना
1 min
365
नजरेत गुंतलो का हसण्यास भुललो
माहीत नाही पण प्रेमात पडलो
नयनी प्याले का अधरी मदिरा
माहीत नाही पण मोहात पडलो
मोहनी रुपाची का रेशमी बंधाची
माहीत नाही पण बंधात पडलो
नशा साथीची का लावण्याची
माहीत नाही पण धुंदीत पडलो
मधाळ बोल का प्रेम वचने
माहीत नाही पण वचनात पडलो
हरवून बसलो का संमोहीत झालो
माहीत नाही पण गुंतून पडलो
अशात आज हरलो का जिंकलो
माहीत नाही पण प्रेमात पडलो
