प्रेम बंधन राखीचा
प्रेम बंधन राखीचा
1 min
269
हिंदू जैन धर्मीयांचा
सण आहे महत्वाचा |
भाऊ बहिनी करिता
सण राखी पौर्णिमाचा ||१||
तिथी श्रावण पौर्णिमा
रक्षा बंधनाचा दिन |
भावाचिया हातावर
राखी बांधते बहिन ||२||
प्रेम बंधन राखीचा
बंध धागा रेशिमाचा |
भाऊ बहिनी करिता
धागा मायेचा प्रेमाचा ||३||
आज बहिन भावाला
आरतीने ओवाळते |
त्याच्या क्षेम दिर्घायूची
दुवा देवाला मागते ||४||
भाऊ बदल्यात तिला
देतो रक्षाचा वचन |
भाऊ बहिनीचा नात
जोडे स्नेहाचा बंधन ||५||