STORYMIRROR

Archana Rahurkar

Others

3  

Archana Rahurkar

Others

पिरती लावणी

पिरती लावणी

1 min
214

काढू नका राया माझी कळ,वाढते धडधड माझ्या उरी

तुमच्यावर हाय माझी पिरती,तुम्ही समजून घ्या कारभारी llधृll


हात नका लावू मी नाजूक कळी

राजन हो पडं गालावरी खळी..

कुंकू तुम्ही लावा मजला भाळी

इष्कात माझी काया ही जळी...

गजरा माळा केसात माझ्या, तुम्ही आणा हो जरतारी,

तुमच्यावर हाय माझी पिरती तुम्ही समजून घ्या कारभारी ll१ll


राया हि रात आली हो मदभरी

रंगात आला तुम्ही लय भारी..

घायाळ अशी तुमची नजर करी

राया तुमची पिरत हाय जादूभरी

दरबारी मी दावते माझी अदाकारी, तुम्हावरी जीव हा वारी

तुमच्यावर हाय माझी पिरती, तुम्ही समजून घ्या कारभारीll२ll


जीव राहीना आज माझा थारी,..

पदर उडे राया राही ना खांद्यावरी

सोडा मज वेळ नाही ही बरी...

खुशीत दिसते तुमची स्वारी...

नाचते राया मी तुमच्या तालावरी,मज आता आणा साज कोल्हापुरी

तुमच्यावर हाय माझी पिरती तुम्ही समजून घ्या कारभारी ll३ll


साहित्याला गुण द्या
लॉग इन