फुलली प्रीत
फुलली प्रीत
1 min
430
फुलली प्रीत तुझी नि माझी
दवात भिजल्या जुईसारखी
जुळली रीत तुझी नि माझी
चांदण्यात निजल्या वेली सारखी
शितल मंद वारा वाहे
बेधुंद मनाच्या लहरीत
नि:क्ष्वासांनी चंद्र लखलखला
काळोख घेऊन मिठीत
ओढ जीवाला अशी लागली
चोहीकडे तुच दिसू लागली
मोहाच्या ताब्यात गुंतले मन
भास होतो तुझाच क्षणोक्षण
