व्हाट्सअप वरचे प्रेम
व्हाट्सअप वरचे प्रेम
1 min
173
व्हाटस्अपच्या दुनियेत
फ्रेंड अनफ्रेंड नवा खेळ
ब्लॉक तुला करावे वाटते
कधीच नव्हता आपला मेळ.
कधीच नव्हता आपला मेळ
फेसबुकवर पुन्हा भेटलास
झटकन झाले बोलण्या आतूर
दुराव्याचा बहाणा क्षणात खलास.
दुराव्याचा बहाणा क्षणात खलास
तुझ्याच संदेशाने सुरू दिवस
किती काय तुला बोलू
रिप्लाय नसेल तर जगच भकास.
रिप्लाय नसेल तर जगच भकास
आणा भाका नव्हत्याच खास
खाणा-खुणा अन् संकेत संदेशाचे
आभासी जगातील खरा प्रवास.
आभासी जगातील खरा प्रवास.
ना आगा ना पिछा, उमेद तरी खास
अॅड डिलीट कान्टॅक्ट, खेळ सतत मनात
नको का हवे न कळणारे, नाते खास.
