पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
14.3K
मंद मंद हा खट्याळं वारा
मना मनाच्या छेडीत तारा
भिजवूनी देह चिंब करिती
मंद मंद या पाऊस धारा || धृ ||
पहिला पाऊस मृगा मृगाचा
शिळ घालतो मुखी निराळी
अथांग सागर लहरी मधूनी
नाचत जाई निसंग होडी
मनी मोहरेरम्य किनारा......1
चावट भारी थेंब तयाचा
रेंगाळून ये उदरा वरती
कोमल देह तिचा बघूनी फूल
पाखरे मनात झुरती
खोड काढूनी देई शहारा.......2
गंध सुगंध सोडत जाई
पहिल्या सरीत भिजता माती
उनाड पक्षी गिरकी घेऊनी
उंच भरारी नभात घेती
गुज सांगतो कानी वारा......3
रंग साजरा इंद्र धनुचा
पाऊस धारा घेऊन आली
जाई मोगरा चाफा चमेली
निळ्या नभाच्या सरित न्हाली
मोर नाचूनीफुलवी पिसारा.....4
