पेरणी
पेरणी
1 min
508
लई दिवसानं लागलं आभाळ गाया
चला बिगीनं पेरणी करुया हो राया
जोडीनं पेरणी करुया हो रायाllधृll
धरा हल तुम्ही मी दान टाकलं
जिमिनीच्या काळजात रुतलं
बीज कुशित टरारलं
पिरतीचा अंकुर फुटल
येई पीक जोमानं पाखरं लागली गाया
चला बिगीनं पेरणी करू हो राया
जोडीनं पेरणी करुया हो रायाll१ll
येईल पीक शिवार बहरी
डोलदार कणिस डुले त्यावरी
टपोरे दानं मनामध्ये भरी
ठेऊ मुलांना शेत राखाया
चला बिगीनं पेरणी करू हो राया
जोडीनं पेरणी करुया हो रायाll२ll
पीक येईल हो कापनीला
जाऊ बाजारी जोडीनं विकाया
भाव येईल अशी लाऊ मया
आज लागलं आभाळ गाया
चला बिगीनं पेरणी करू हो राया
जोडीनं पेरणी करुया हो रायाll३ll
