पारवा
पारवा

1 min

19
भर दुपार उन्हात
निरजन माळावर
धरी सावली बुडाशी
उभा एकाकी पिंपर
उभा पिंपर सोशितो
उष्ण वाऱ्याच्या त्या झळा
पायथ्याच्या सावलीत
काट्या कोरांट्याचा आळा
तिथे जरा सावलीत
टेकवली पाठ थोडी
शिणल्या या जिवलागी
लागे निदरेची गोडी
घुमे पारवा एकांती
उंच शेंड्यात पानात
उघडले डोळे माझे
शीळ घुमता कानात
घेई उंच रे भरारी
शल्य मनाचे तू सोडी
पाही दुनियेचे रंग
नको एकांताची गोडी.