निसर्ग
निसर्ग

1 min

12.3K
खेळू नका माझ्याशी
निसर्ग सांगत आहे,
बेरीज, वजाबाकी
मला पण येत आहे.
तुम्ही खेळता झाडाशी
मी पाऊस करतो वजा,
उषण्ते चि करतो बेरीज
मग काय होते बघा.
आटून जातील नदी नाले
वाहणार नाही शुध्द वारे,
पाण्या साठी वणवण होईल
समृद्धी मग कशी येईल.
एक दिवस मागतो मी
हिशोब सारे,
येते वादळ वाहते वारे,
पण्यात बुडवतो मि सारे .
निसर्ग आहे मी
सहजा, सहजी चिडत नाही,
पण कोपलो जर मी,
मग कोणालाच सोडत नाही