कोरोना
कोरोना

1 min

11.7K
एका विषाणूने बघा काय केले,
चालत्या फिरत्या जगाला घरात बसवले
आधीच होता माणूस, माणसापासून दूर,
सोशल डिस्टंसने अजून दूर सारले
माणसाच्या संयमाचा लागला आहे कस,
विषाणू म्हणतो माणसाला गप्प घरात बस
कोरोनाच्या साखळीला लावायचा आहे ब्रेक,
गावाचीसुद्धा तू पाहू नकोस वेस
स्वतःचा जीव घालून धोक्यात,
डॉक्टर पोलीस झाले देवदूत
त्याच्यासाठी मात्र एवढंच करूया,
घरात बसून एक लढाई आपण लढूया
शहर बंद, देश बंद, जगसुद्धा बंद आहे,
देव सोडून, आता विज्ञानालाच नवस करत आहे
शहर सोडून गरीब वाट गावाची धरत आहे
मारेल रोग नंतर, आधी भूकच मारत आहे