STORYMIRROR

Archana Murugkar

Others

4  

Archana Murugkar

Others

निसर्ग ठेवा

निसर्ग ठेवा

1 min
255

निरभ्र निळे वरती अंबर

उमटे चित्र शांत पाण्यावर

तरल तरंगांतूनी तरंग उमटती

निर्मळ पात्रातूनी हसते इंद्रावती. 


थोडीशी झाडी, काठही सुंदर

रेशमी झबल्याची हिरवी झालर

तपकिरी मृदेचे कोंदण सभोवार

नयन खिळवती दृश्य मनोहर. 


ओले वारे ल्यावे साऱ्यांनी

चिंब भिजावे निसर्ग प्रेमाने

करावे निसर्गरक्षण हर्षभराने

अनुभवावे उद्या हेच लेकराने.


मानव असे औट घटकेचा

निसर्ग अमृत अनंतकाळाचे

करावा जतन ठेवा निसर्गाचा

करी वापर मनुजा चातूर्याचा.


Rate this content
Log in