Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

dnyanada wani

Romance Tragedy

3  

dnyanada wani

Romance Tragedy

निजलीस का गं तू?

निजलीस का गं तू?

1 min
29


निजलीस का गं तू?

जाग ना जरा...

उशावरील आसवे,

टीप ना जरा


व्यस्त दिवसांना कुठे,

यांची काही किंमत?

पण शांत रजनीत,

ते येतात ओझरत


तुझ्या मऊ कुशीत,

निजायचंय मला...

अन् तुझ्या गर्द केसांमध्ये,

सावरायचंय स्वतःला!


त्या डोळ्यांतील चमक बघून...

होतो मी स्तब्ध,

असं बोलतच राहिलो,

अन् आसवांनी गाठला लब्ध


निजलीस का गं तू ?

जाग ना जरा...

उशावरील आसवे,

टीप ना जरा


फक्त स्वप्नापूरती तरी,

ये ना जरा...

उशावरील आसवे,

टीप ना जरा


Rate this content
Log in