नातं असावं..
नातं असावं..


नातं असावं...
फुलासारखं फुलणारं,
फुलपाखरा सारखं उडणारं.
चुकुन निसटलं हातातुन तरी हि,
रंग मागे सोडणारं.. नातं असावं...
दाटुन आलेल्या मेघासारखं,
आणि वार्याच्या वेगासारखं.
पर्वताच्या एका आधाराने,
मनसोक्त बरसणारं....नातं असावं...
मातीवरच्या थेंबासारखं,
मग येणार्या गंधासारखं.
सहवासाच्या ओढीने,
मनात नेहमी दरवळणारं...नातं असावं...
अथांग, शांत सागरा सारखं,
आणि अवखळ लाटांसारखं
साठवुन न ठेवता सगळं,
किनार्यावर पोहचवणारं... नातं असावं...
तार्यांच्या नक्षत्रांसारखं,
पोर्णिमेच्या चंद्रासारखं.
सगळं काही घेऊन कवेत,
आभाळभर उरणारं..नातं असावं..
प्रेम पत्राचं वा असुदे मंगळसूत्राचं,नातं असावं..
प्रेमाच्या खात्रीचं,आणि प्रेमात हि मैत्रीचं..
कुठल्याही बंधना शिवाय,
मनांना एकत्र बांधनारं.
कुठल्याही अपेक्षे शिवाय,
जिवनभर पुरणारं.
प्रत्येक नात्यात मैत्रीचं एक नातं असावं....!!!