बोल काही..
बोल काही..

1 min

30
एकवार फिरुनी मजला हाक तु मारुनी जा,.
तुझिया मनीचे दुःख सारे ह्या मनी पेरुनी जा.
आठवुनी बघ रूपेरी त्या क्षणांचे गालिचे,
शल्य जे बोचरे प्रिया रे विसर ते सारुनी जा.
हात घे हातात माझा नजर दे नजरेस या,
मोहुनी जा या क्षणाला अन् मला भारुनी जा.
ही अनामिक शांतता जिवघेणी वाटते,
जिंदगी आभास आणि शून्य मजला भासते,
बोल काही राजसा तू मला तारुनी जा..
तुझिया मनीचे दुःख सारे ह्या मनी पेरुनी जा..