मनमोहिनी
मनमोहिनी
3 mins
228
बेधुंद करुन मजला
का धुंद होऊन जाते
डोळयात पाहूनी का झोप उडवून जाते
बहुत समयाने झोप लागता
का माझ्या स्वप्नात येऊनी जाते
देवूनी तुझे हदय मजला
का माझे हदय घेऊनी जाते
वेड लावुनी मज प्रेमाचे
का तुही प्रेमवेडी होऊनी जाते
मला नजरेने घायाळ करुनी
का तुही घायाळ होऊनी जाते
गायला लावुनी मज गाणे प्रीतीचे
का तुही प्रेमगीत गाते
करुनी मजला बेभान
का तुही भान हरवून जाते
देवुनी मजला स्वप्न नवे
का तुही स्वप्न रंगवून जाते
