भेटीची आतुरता
भेटीची आतुरता
1 min
231
नटुनी थटुनी वाट पाहते
तुझी मी दारी
नेसुनी शालू भरजरी
भेटीची उत्कंठा दाटूनी आली उरी
बुजती कान कसल्याही आवाजा
ओढ लागली तुझी
आता उशीर नको राया
विरहाने जीव हा लागे तुटाया
सर्व काही आहे
फक्त आहे तुझी कमतरता
कोण जाणे का लागली मना
तुझ्या भेटीची इतकी आतुरता
आता वाट पाहवेना साजना
तुजवीन हा जीव राहिना
ये लवकर परतुनी घरा
वाट पाहे तुझी अप्सरा
