STORYMIRROR

Sandip Khurud

Others

3  

Sandip Khurud

Others

जिद्द

जिद्द

1 min
234

जिद्दीनं पेटून उठावे

संकटाला निधडया छातीनं खेटावे

दु:खाच्या डोंगराला

शूराच्या काळजाने कडाकड फोडावे

 

असो कितीही मोठी संकटे

त्यांना हसत सामोरे जावे

अन् हिंमतरुपी कुऱ्हाडीने

कचाकच तोडावे

 

यशाच्या वाटेत असोत कितीही अडथळे

असोत कितीही दु:खाचे कठडे

त्यांना मर्दाच्या छातीने

दणादण फोडावे

 

संकट हे आयुष्यात प्रत्येकाच्या येतातच

तेव्हा त्यांना का भ्यावे?

प्रयत्नांवर हरून पाणी का सोडावे?

असली संकटे मनगटाच्या जोरावर

दाही दिशा उडवावे

 

देवानं सोडलयं जगात लढण्यासाठीच

त्यामुळे पूर्ण ताकदीने लढावे

संकट,अडचणी अन् दु:ख

यांच्या मानगुटीवर पाय देवून उभा रहावे

 

लढता लढता मरण आले तरी बेहतर

पण हरून का मरावे?

करा जीवनात असं घणाघाती युद्ध

की मेल्यानंतरही नाव मागे उरावे


Rate this content
Log in