मैत्री
मैत्री
1 min
429
ह्याला ना कसले बंधन
ह्यात ना कसल्या अपेक्षा
ना धन्यवाद ना माफी
नात्यात नाते सुंदर नाते
नाते मैत्रीचे
ना बंधन ना हट्ट
तरीही नात घट्ट
ना अपेक्षा ना रूसवे
ना रूप रंग फसवे
हक्काने द्यावे घ्यावे
हक्क न गाजवता
न मागता बरेच काही
काहीही न मागता
सहजच लुटावे अवघे
नात्यात ह्या
गवसते मोकळीक
ईथेच फक्त
तरीही ओल खोल
मन गाभ्यात
प्रेमात ही शोधतो
म्हणूनच तर मित्र
निर्भेळ हलके फुलके
नात्यात नाते, नाते मैत्रीच
