माय सावित्री
माय सावित्री
1 min
403
माय सावित्री
ज्ञानज्योती सावित्री
ज्ञान गंगोत्री.....!!
फुले असुनी
वेचलेस गं काटे
जीवन वाटे.....!!
शेण,चिखल
केलीस तू सहन
अर्थ गहन....!!
मुलींची काढी
भिडेवाड्यात शाळा
शिकवी बाळा....!!
नाही पगार
ना वर्गखोली होती
झाडाखालती....!!
ना मानधन
वेतनवाढ नाही
शिक्षण पाही....!!
मुक्त केलीस
सारीच जी बंधने
स्री शिक्षणाने.......!!
करते तुला
नम्र अभिवादन
कोटी नमन.....!!
ज्ञानाचा वेलू
गगणाला नेईन
मी शिकवीन.....!!