मावळ माती
मावळ माती
1 min
295
मावळ माती, आमची मावळ माती
पहाड वस्ती, चाल घाटाची
हित फिरायची हिंम्मत
फक्त वाघ वारा, मावळ्यांची
इंद्रायणी, आमची पवनामाई
पान्हावते मावळ माई
धन अंबेमोहर, इंद्रायणी
दुधगंगा वाहे घरोघरी
करवांद, गोटी आंब बोर
भोकर जांभळ रानमेवा
मध, माडी, जाम लईच ग्वाड
ढोल ताशा लीझीम खेळ
कुस्तीच मैदान मार
शिवबाच्या सैन्याची खेती
रांगड गडी हाती दगड फोडी
उठती मावळी भूत
पळवली सैतानी मुगल
मावळा मोती, मुलुख झोडी
मावळ माती, आमची मावळ माती
दरी दरीतूनी ललकारी
हर हर महादेव, हरहर महादेव
जय भवानी जय शिवाजी
जय मावळ, जय महाराष्ट्र
