माणुसकी
माणुसकी
1 min
415
एक प्राजक्त उभा कुंपणात
एक फूल चढले देवाच्या पाऊली
दूसरे मात्र तुटवले गेले पायदळी ।
निरांजनाच्या दोन वाती
एक तेवते सजते दिवाळी
दूसरी पेटते होते होळी
कारण त्या समाजाच्या ज्योती ।।
असाच असतो हा दीपवृक्ष
तेवावे कुठे, कुठे पडावे नसते हाती
मग होते सोन्याची ही माती
जाळा भेदभाव जो घेतो माणुसकीचा भक्ष ।।
