माणुसकी
माणुसकी
1 min
191
एक प्राजक्त उभा कुंपणात,
एक फूल चढले देवाच्या चरणी ,
दुसरे मात्र तुडवले गेले पायदळी ,
माणसांचे फूल समाज तो पारिजात |
निरांजनाच्या दोन वाती ,
एक तेवते सजते दिवाळी ,
दुसरी पेटते होते होळी ,
कारण त्या समाजाच्या ज्योती |
असाच असतो हा दीपवृक्ष,
तेवावे, कुठे पडावे नसे आपुल्या हाती,
मग होते सोन्याची ही माती,
जाळा भेदभाव जो घेतो माणुसकीचा भक्ष |
