माझ्या मैत्रिणी
माझ्या मैत्रिणी


दोन अनोळखी मुली
अचानक आयुष्यात येतात..
नातं आपलं काही असो
आयुष्याचा भाग होतात
सुख दुःखात माझ्या ..
त्या सदा सहभागी ..
पुण्यचं म्हणावे
माझे या जगी ..
तुमचे सारे निर्णय
माझ्या होकारावर..
इतक्या कमी दिवसात
जीव लावतात माझ्यावर
मन खूप प्रसन्न असते
जेव्हा तुम्ही सोबत असता
अन हसून पोट दुखते
जेव्हा आपसात भांडत बसता
तुम्हाला एकमत करताना
उडते माझी तारांबळ
झाली तुमची गट्टी की
वाढते माझे बळ..
छोट्या जरी असल्या तरी...
मोठ्या मोठ्या गोष्टी..
मी होतो लहान अन
गाठतात त्या साठी...
दिवस खूप आनंदी
जातात आता निघून
२ पऱ्या येतात मग
माझ्या सखी म्हणून..
नातं तुमचं माझं ...
असुद्या काही हि
बनून रहा अशाच
माझ्या छोट्याशा मैत्रीणी..