STORYMIRROR

krunal tarhekar

Others

3  

krunal tarhekar

Others

माझ्या हृदयातील एक कळवळ

माझ्या हृदयातील एक कळवळ

1 min
198


"ॠणानुबंध" म्हणजे माणसां-माणसतलं अटूत बंधन...

प्रेम आणि विश्वास" त्या" अटूत , रंगबेरंगी धाग्याचे दोन टोक.....

दोन ह्रदय एकरूप होऊन, क्रांतीज्योतीप्रमाणे अखंड प्रकाश जगाला अर्पण करावं...

असं एक "बंधन" असावं पण; त्या बंधनात पारतंत्र्याची जाणीव कधीच न व्हावी.......।।१।।


......ॠणानुबंधाच्या पडल्या गाठी...........असंच एक नातं असतं बहीण-भावाचं.........

..,.... कधीतरी मलाही वाटायचं, असावी एक "बहीण"...।।२।।


मलाही तिने "दादा" म्हणून हाक मारावी.......

मीही तिला "छकुली" म्हणून हाक मारावी.....

तिनेही करावी मस्करी.....मस्ती माझ्यासंगे...... आणि.....

मीही तिच्या खोडकरपणास साथ द्यावी .... तीची चूकही मी सुखरूपपणे पचवावी......

.......... कधीतरी असंही वाटतं.......।।३।।


कधीतरी मी ही तिला विनाकारणंच

"प्रेमळपणाने" रागवावं. .‌...

तिचे ते मनोहर रूसणे.... धुसफूसणे.....

तिला मनवण्यास माझांच जीव कासावीस व्हावा.....

अश्याही अनुभवांची कधीतरी गाठ होवो......

.......... कधीतरी असंही वाटतं.........।।४।।


मीही तिच्यावर आभाळा एवढं प्रेम करावं....... प्रेमाचं अमृत पाजावं आणि तो अमृताचा प्याला कधीच संपू नये.....


कधीतरी मी ही सुख-दुखात , हसावं-रडावं मनभरून "तिच्यासोबत".....

...........कधीतरी असंही वाटतं........।।५।।


माझ्या जीवनाचा एकाही क्षणाचा "आनंद" मी न लुटावा "तिच्याशिवाय".....

जगावं-मरावं फक्त अश्या व्यक्तीसाठी......

भावना मात्र एकचं......

असावी अशीही एक " बहीण" माझ्या हक्काची ..... प्रेमळ, समजूतदार, मधुर...

.......... कधीतरी असीही कुणकुण....ख़ंत... वाटतंच या माझ्या मनाला......।।६।।


Rate this content
Log in