माझ्या हृदयातील एक कळवळ
माझ्या हृदयातील एक कळवळ


"ॠणानुबंध" म्हणजे माणसां-माणसांतलं अतूट बंधन...
प्रेम आणि विश्वास "त्या" अतूट, रंगबेरंगी धाग्याचे दोन टोक.....
दोन हृदय एकरूप होऊन, क्रांतीज्योतीप्रमाणे अखंड प्रकाश जगाला अर्पण करावं...
असं एक "बंधन" असावं पण; त्या बंधनात पारतंत्र्याची जाणीव कधीच न व्हावी.......।।१।।
ऋणानुबंधाच्या पडल्या गाठी...
असंच एक नातं असतं बहीण-भावाचं...
कधीतरी मलाही वाटायचं, असावी एक "बहीण"...।।२।।
मलाही तिने "दादा" म्हणून हाक मारावी.......
मीही तिला "छकुली" म्हणून हाक मारावी.....
तिनेही करावी मस्करी..... मस्ती माझ्यासंगे...... आणि.....
मीही तिच्या खोडकरपणास साथ द्यावी....
तिची चूकही मी सुखरूपपणे पचवावी......
कधीतरी असंही वाटतं.......।।३
।।
कधीतरी मीही तिला विनाकारणच "प्रेमळपणाने" रागवावं.....
तिचे ते मनोहर रूसणे.... धुसफूसणे.....
तिला मनवण्यास माझाच जीव कासावीस व्हावा.....
अशाही अनुभवांची कधीतरी गाठ होवो......
कधीतरी असंही वाटतं.........।।४।।
मीही तिच्यावर आभाळाएवढं प्रेम करावं.......
प्रेमाचं अमृत पाजावं आणि तो अमृताचा प्याला कधीच संपू नये.....
कधीतरी मीही सुख-दुःखात, हसावं-रडावं मनभरून "तिच्यासोबत".....
कधीतरी असंही वाटतं........।।५।।
माझ्या जीवनाचा एकाही क्षणाचा "आनंद" मी न लुटावा "तिच्याशिवाय".....
जगावं-मरावं फक्त अशा व्यक्तीसाठी......
भावना मात्र एकच......
कधीतरी अशीही कुणकुण.... ख़ंत... वाटतंच या माझ्या मनाला......।।६।।