STORYMIRROR

Rama Khatavkar

Others

3  

Rama Khatavkar

Others

माझी मराठीच हवी

माझी मराठीच हवी

1 min
32

माझ्या मुलखापासून 

दूर दूर मी रहाते 

मायबोली ना बोलता 

मज उदास गमते 


मायबोलीची गं माझ्या 

मज आसच लागते, 

जणू भेटीलागी येते 

माझी मायच वाटते


बहु दिसांनी ऐकते 

माझी बोली ही मराठी 

वाटे मोकळ्या होतात 

सार्‍या मनातल्या गाठी. 


बोली आईची, मायेच्या 

गर्भातून ऐकलेली.

जणू निगुतीने शाल 

तिने मला पांघरली. 


हिंदी-इंग्रजी मिसळ 

जणू वाटे भाषा नवी, 

पण मला आसपास 

माझी मराठीच हवी.


Rate this content
Log in