माझी कविता
माझी कविता
1 min
288
आयुष्याचे पाने पलटवीत होते
रोजनिशी जीवनाची मी वाचत होते
सुखा बरोबर दुःखही आले होते
सुखाचा हात सोडून दुःख नादंत होते
रोजनिशीचे पान सांगत जीवन गाण
जगवं आयुष्य असं सुंदर छान
सुखालाही दुःखाचा वाटावा मान
रुबाब दुःखाचा पाहून सुटावे भान
सुखही ओंजळीत भरभरून भराव
इंद्रधनुच्या सप्तरंगात न्हाऊन निघाव
हसून चाफ्याने पानोपानी फुलाव
दुःखाने ही मग हरखून जाव
ऊन सावलीचा खेळ हा आहे
मानवाच्या हाती सांगा काय आहे
कार्य चांगले करीत राहावे
पाहा विचार करुन हे सत्य आहे
